नामांकन प्रक्रियेत सुधारणा आवश्यक (GS Paper 2)

नामांकन प्रक्रियेत सुधारणा आवश्यक

  • भारतातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकदा तांत्रिक कारणांमुळे (technical grounds) उमेदवारांचे नामांकन फेटाळले जाते. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे — ज्यांचे नामांकन फेटाळले जाते, त्या उमेदवाराला त्याचे कारण सांगितले जात नाही, आणि त्यांना त्रुटी दुरुस्त करण्याची संधीही दिली जात नाही. म्हणजेच, कोणत्याही स्पष्टीकरणाविना आणि सुधारण्याची संधी न देता त्यांचे नामांकन रद्द केले जाते.
  • ही प्रक्रिया कायद्याच्या दृष्टीने वैध (legally valid) असली तरी ती लोकशाहीच्या दृष्टीने अन्यायकारक (democratically unfair) आहे.

नामांकन प्रक्रिया

  1. ही प्रक्रिया Representation of the People Act, 1951 च्या कलम 33 ते 36 आणि Conduct of Elections Rules, 1961 द्वारे नियंत्रित केली जाते.
  2. या प्रक्रियेत Returning Officer (RO) यांना असाधारण (extraordinary) विवेकाधिकार दिलेले आहेत.
  3. कलम 36 नुसार RO ला अधिकार आहे की तो नामांकनपत्रांची तपासणी करून अवैध असल्यास ते फेटाळू शकतो
  4. ही शक्ती अत्यंत व्यापक आहे आणि मतदान सुरू होण्यापूर्वी न्यायालयीन पुनरावलोकनापासून (judicial review) संरक्षित आहे.
  5. नामांकन फक्त महत्त्वाच्या दोषांसाठीच (substantial defects) नाकारले जाऊ शकते, परंतु “महत्त्वाचे दोष” म्हणजे नेमके काय, याची स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही.
  6. नामांकन मंजूर किंवा नाकारण्याविरोधात एकमेव उपाय म्हणजे निवडणूक याचिका (Election Petition) आणि ती फक्त मतदान झाल्यानंतरच दाखल करता येते.

प्रक्रियात्मक जाळे (Procedural Traps)

  1. RPA Act, 1951 च्या कलम 36 नुसार फक्त पात्र उमेदवारांनाच निवडणूक लढता येते, पण “पात्रता” म्हणजे नेमके काय याची स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही. पात्रतेची पडताळणी प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे.
  2. सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेची, देणीची आणि गुन्हेगारी प्रकरणांची माहिती उघड करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु जर उमेदवाराने ही माहिती प्रामाणिकपणे दिली, तर ती माहितीच नामांकन फेटाळण्यासाठी आधार बनू शकते. कारण RO ला त्यामुळे आणखी एक मुद्दा मिळतो ज्यावरून तो अर्ज रद्द करू शकतो. या उघडकींमुळे तांत्रिक चुकांची शक्यता आणि फेटाळणीचा धोका अधिक वाढतो.

शपथ जाळे (Oath Trap) 

  1. नियमांनुसार उमेदवाराने नामांकनानंतर पण तपासणीपूर्वी एका अधिकृत प्राधिकाऱ्यापुढे शपथ घ्यावी लागते.
    समस्या अशी की — जर उमेदवाराने वेळेपूर्वी शपथ घेतली, तर ती शपथ अवैध (invalid) ठरते. जर वेळेनंतर घेतली, तर अर्ज फेटाळला जातो.
  2. आणि जर चुकीच्या अधिकाऱ्यापुढे घेतली, तरीही अर्ज रद्द होतो.

नोटरीकरण जाळे (Notarization Trap)

  • प्रत्येक उमेदवाराला Form 26 हलफनामा (affidavit) एक निश्चित प्राधिकाऱ्याकडून नोटरीकृत करून घ्यावा लागतो.
  • या प्रक्रियेत लहानसहान चुका झाल्यास अर्ज रद्द केला जातो.

प्रमाणपत्र जाळे (Certificate Trap)

  • नामांकनासोबत उमेदवाराने नगरपालिका, वीज मंडळ किंवा इतर सरकारी विभागांकडून “No Dues Certificate” मिळवणे आवश्यक असते. जर उमेदवार हे प्रमाणपत्र वेळेत मिळवू शकला नाही, तर त्याचे नामांकन फेटाळले जाते.
  • परिणामी, या प्रक्रियेत लोकशाही वैधतेपेक्षा प्रशासकीय अनुपालनावर (bureaucratic compliance) अधिक भर दिला जातो.

उपाय (Reforms)

  1. जर अर्जात काही त्रुटी असतील, तर उमेदवाराला त्याची लेखी माहिती देणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराला किमान 48 तासांचा वेळ द्यावा, जेणेकरून तो आपल्या अर्जातील चुका दुरुस्त करू शकेल. कॅनडा , अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये उमेदवारांना अशा सुधारण्यासाठी वेळ दिला जातो. भारतात मात्र एकदा चूक झाल्यास अर्ज थेट फेटाळला जातो.
  3. अर्ज फेटाळल्यास, उमेदवाराला फेटाळणीचे कारण स्पष्टपणे कळविणे आवश्यक आहे.
  4. याशिवाय भारताचा निवडणूक आयोग एक डिजिटल डिफॉल्ट नामांकन प्रणाली (digital default nomination system) विकसित करू शकतो, ज्यामुळे कागदपत्रांची गरज कमी होईल आणि प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.

Leave a Comment