युनेस्कोने लखनऊला अधिकृतपणे त्यांच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये समाविष्ट केले आहे.लखनौने आपल्या प्रसिद्ध आणि विविध खाद्य परंपरेमुळे जागतिक खाद्यनकाशावर विशेष स्थान मिळवले आहे. युनेस्कोने (UNESCO) लखनौला “क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी” (Creative City of Gastronomy) म्हणून घोषित केले आहे.
ही प्रतिष्ठित मान्यता लखनऊच्या शतकानूशतके जुन्या अवधी पाककृती आणि त्यांच्या हिंदू मुस्लिम संस्कृतीचे अनोखी मिश्रण यांचा हा सन्मान आहे.
या घोषणेसह लखनऊ चे जगप्रसिद्ध कबाब मिठाई आणि स्ट्रीट फूड आता जागतिक पाककृती नकाशावर झळकणार आहे.
उझबेकिस्तान येथे झालेल्या 43 व्या युनिक्सो जनरल कॉन्फरन्स मध्ये ही घोषणा करण्यात आली.
उत्तर प्रदेश राज्य सरकार मधील पर्यटन संचनालय ने या नामांकनासाठी संपूर्ण दस्तावेज तयार केला आणि हा प्रस्ताव 31 जानेवारी 2025 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाला पाठविण्यात आला.
युनेस्कोने 31 ऑक्टोबर रोजी, म्हणजे वर्ल्ड सिटीज डे (World Cities Day) च्या निमित्ताने, आपल्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये या वर्षी समाविष्ट झालेल्या 58 शहरांच्या यादीत लखनौचा समावेश केल्याचे जाहीर केले.
लखनऊ ची ओळख त्याच्या समृद्ध अवधी पाककृतीमध्ये खोलवर रुजलेली आहे जी त्याच्या शाही परंपरा आणि पाककृतीसाठी ओळखली जाते. या नामांकनामध्ये विशेषतः पारंपारिक पदार्थांवर प्रकाश टाकण्यात आला. यातील गलेती कबाब व टुडे कबाब लखनऊच्या शाही पाककृतीचे प्रतीक मानले जाते. तसेच निहारी कुलच्या ,पुरी कचोरी आणि टोकरी चार्ट हे स्थानिक पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ लखनऊच्या चैतन्यशील संमिश्र संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात येथे पाककृती परंपरा शतकानू शतके सतत सांस्कृतिक देवाण-घेवाण यामधून विकसित झाल्या आहेत
युनेस्कोच्या गॅस्ट्रोनॉमी शहर या पदनामामुळे लखनऊला अनेक प्रकारचे फायदे होतील. यात लखनऊचा शाश्वत आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल तसेच स्थानिक स्वयंपाकी कारागीर आणि लहान अन्न उद्योगांना पाठिंबा मिळेल. पारंपारिक पाककृती आणि स्वयंपाक पद्धतीचे जतन करणे यामुळे शक्य होणार आहे. तसेच भारताची सांस्कृतिक राजनैतिकता आणि सॉफ्ट पॉवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रमाणात बळकट होईल.
लखनऊच्या समावेशासह भारतातील एकूण नऊ शहरे या प्रतिष्ठित नेटवर्कचा भाग आहे ज्यात जयपुर ,वाराणसी, चेन्नई ,मुंबई, हैदराबाद ,श्रीनगर , ग्वाल्हेर,कोझिकोड व आता लखनऊचा यामध्ये समावेश झाला आहे.
लखनऊ हे हैदराबाद नंतर भारतातील दुसरे पाककृती शहर बनले आहे जे भारताच्या पाककृती समृद्धता आणि विविधतेची पुष्टी करते.यापूर्वी हैदराबाद या श्रेणीत 2019 मध्ये समाविष्ट झाले होते.
युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क ची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली. याच उद्दिष्ट शाश्वत शहरी विकासासाठी एक धोरण म्हणून संस्कृती ,सर्जनशीलता आणि नव उपक्रम स्वीकारणाऱ्या शहरांना प्रोत्साहन देणे हे आहे. संगीत ,चित्रपट ,साहित्य, डिझाईन ,पाककृती, हस्तकला आणि लोककला व मीडिया कला या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे.
हे नेटवर्क आंतरराष्ट्रीय सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण , आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रेरित आर्थिक विकासाला प्रोत्साहन देते शहरांना त्यांची ओळख वारसा आणि न उपक्रम जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यास सक्षम करते. यावर्षी “आर्किटेक्चर” (architecture) हे या नेटवर्कमध्ये एक नवीन सर्जनशील क्षेत्र (creative field) म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे, असे युनेस्कोच्या प्रेस विज्ञप्तीत नमूद केले आहे.
या सन्मानानंतर, लखनौ आता 100 हून अधिक देशांमधील 408 शहरांच्या यादीत सामील झाले आहे,