ICC महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2025

icc women's world cup 2025

  • भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.
  • 2 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम वर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळण्यात आला
  • पहिल्या डावात भारतीय संघाने 7 बाद 298 धावा केल्या. ह्या धावांचा विचार केला तर महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्या होत्या.

icc women's world cup champions

  • भारतीय संघातील दीप्ती शर्माने भारतासाठी तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
  • भारतीय महिला क्रिकेट संघाच नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत कौर तर उप कर्णधारपद स्मृती मानधना यांच्याकडे होते
  • आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2025 ही स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान भारत आणि श्रीलंकेत आयोजित केल्या गेल्या. 2025 महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धेची 13 वी आवृत्ती आहे आणि त्यात आठ संघांचा समावेश होता.
  • 1978 1997 आणि 2013 नंतर 2025 चा विश्वचषक हा भारतासाठी चौथा विश्वचषक ठरला आणि श्रीलंकेचा हा पहिलाच विश्वचषक आहे.
  • 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया या संघाने विश्वचषक जिंकला होता व त्याचे हे सातवे विजेतेपद होते
  • 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल ने “ब्रिंग इट होम” हे अधिकृत विश्वचषक गाणे तेथे सादर केले होते
  • सर्वाधिक महिला विश्वचषक विजेतेपदाचा विक्रम ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या नावावर आहे. तसेच इंग्लंडने सुद्धा चार वेळा विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे.
  • पहिला विश्वचषक 1973 मध्ये इंग्लंड मध्ये आयोजित करण्यात आला होता. तर 2005 पासून महिला विश्वचषक नियमितपणे चार वर्षाच्या अंतराने आयोजित केली जात आहे. आतापर्यंत खेळली गेलेली बारा विश्वचषक पाच देशांमध्ये झाले आहेत ज्यामध्ये भारत आणि इंग्लंडने प्रत्येकी तीन वेळा यजमानपद भूषवले.

Leave a Comment